नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday 7 February 2012

मांजर, मामी आणि मासे...

अगदी छोट्यात छोट्या जीवाविषयी देखील आत्मीयता वाटायला हवी. फक्त माणुसकीच्या दृष्टीतूनच नव्हे तर काय सांगावे नेमका पुढला जन्म तोच असला तर काय घ्या...म्हणून. स्वार्थाने.

सकाळचे साडेनऊ आणि रविवारचा दिवस. त्यामुळे सिटीलाईट मार्केट रसरशीत दिसत होते. एखाद्या मांसल माशासारखे. फडशा पाडायला नक्की कुठून सुरवात करावी असा मनाचा गोंधळ उडवणारे. मी लगबगीने आत शिरत होते त्यावेळी माझे लक्ष समोर होते. आणि तरी पायाशी काही हालचाल जाणवली आणि नजर खाली वळली. एक अगदी चिटुकलं मांजरीचं पिल्लू लडबडत चाललं होतं. एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे. मी रस्त्याने चालत होते म्हणून ते मला दिसलं पण एखादी गाडी आली तर त्या चालकाला हा जीव दिसणे कठीण. मी थबकले तर एका क्षणात अजून एक पिल्लू पुढे आलं...बाजूला असलेल्या टोपली आडून. दोघे दोघे. इवलेसे. अंगात जेमतेम जीव असलेले. धडपडत दोघे पलीकडे जाऊ लागले. आणि त्यांच्याबरोबर मी देखील पार अलीकडे पोचले.

मामाचं नवीन लग्न झालं होतं. आणि त्याने गोरी बायको आणली होती. मी सात वर्षांची होते. आणि त्या वयात तसेही ही मामी गोरी आहे की पांढरीफटक आहे हे नव्हते कळले. आणि बऱ्याचदा माणसाची ओळख झाली, म्हणजे त्याच्या मनाची ओळख झाली, की मग त्याच्या शारीरिक गोष्टींना आपोआप व्यंग वा गुण असे ठरवले जाते. आणि मामी कोणाकडेच बघून फारशी हसत नाही हे कळल्यावर ती दिवसेंदिवस गोरीपान नाही तर पांढरीफटक वाटू लागली. मामाच्या लग्नात मसाला दूध होते. आणि त्या दुधाचा रंग मामीच्या रंगाशी मिळताजुळता होता असे त्यावेळी आम्हीं सर्व भावंडांनी लग्नगृहातच ठरवलं होतं. ती अजिबात हसत नाही हा एक गंभीर प्रश्र्न आहे असे त्यावेळी कळले नव्हते. पण ती आम्हां कोणा भाचरांशी काही बोलत नाही हे मात्र जाणवले. मामाचं लग्न झालं, मामी घरी आली त्यावेळी मोठमोठे कुरमुऱ्याचे लाडू, आणि हे मोठे केशरी, हिरव्या रंगाचे कानवले असे काही विनोदी पदार्थ देखील माझ्या आजोळी दाखल झाले होते. म्हणजे अॅलीस इन वनडरलॅण्ड सारखं. आपण छोटेछोटे आणि चहाचा कप भला मोठा ! बाहेरची खोली सगळी त्यांनीच भरून गेली होती. त्या आधी असे अगडबंब लाडू वगैरे कधी नजरेस पडले नव्हते. "हे कायेय मावशी ?" मी मावशीला विचारले. तेव्हां तिने मला सांगितले..."रुखवत...रुखवत म्हणतात ह्याला."
"पण हे कोणी दिलं आपल्याला ?"
"अगं ! ती नवी मामी आलीय ना...तिच्या आईने आणि बहिणींनी दिलंय हे तिला !"
"तिला ?! म्हणजे हे सगळं एव्हढं मोठं मोठं ती खाणारेय ?" मला ती गोरी मामी मोठ्ठा कानवला खातानाच दिसायला लागली !
"अगं नाही ! तुम्हांला सगळ्यांना पण मिळणार आहे थोडं थोडं !"
"मग दे की आम्हांला मावशी ! भूक लागलीय ना !"
"थांब गं जरा...विचारुया आपण तिला !"
मावशीशी देखील नवी मामी हसली नव्हती वाटतं...कोण जाणे मग पुढे त्या अगडबंब लाडवांचं आणि राक्षसी कानवल्यांचं काय झालं.
एक दिवस नवी मामी चारपाच मांजरांचे लाड करताना दिसली. गोरी मामी आणि पांढरी मांजरं.
"अगं, आपली नवी मामी एकदम प्रेमळ आहे हं !" माझी मावसबहीण मला म्हणाली. ती पण अशीच. मी सात. तर ती नऊ.
"कोणी सांगितलं ? तिने लाड केले तुझे ?" मी विचारलं. घरात मी सर्वांची लाडकी होते. मग मला सोडून नव्या मामीने हिचे कसे आणि कधी लाड केले हा तसा एक गंभीर प्रश्र्न होता. आणि तो माझ्या डोक्यावर पडला होता. प्रेमळ माणसं लाड करतात. माझे मोठ्ठे मामा प्रेमळ होते. ते आमचे खूप लाड करायचे. आम्हांला गोष्टीबिष्टी सांगायचे. मला ते मांडीवर घ्यायचे.
"नाही गं !"
"मग ?" ती प्रेमळ असल्याचा मला पुरावा हवा होता. तसे आम्हीं त्यावेळी खूप चर्चा वगैरे करायचो. आणि गल्लीत शोधबिध घ्यायचो. म्हणजे गल्लीत त्या टोकाशी एका जागी गुलाबी पावडर मिळते. आणि ती तिथे ढिगाऱ्याने वाळवत ठेवलेली असते. तिने म्हणे लोकं दात घासतात. तिथल्या रखवालदाराची नजर चुकवून जर पावडर पळवून आणली तर आपण ती खाऊ शकतो. आणि ती गोड लागते हे आम्हीं असंच शोधून काढलं होतं. आमचे सगळ्यांचे आईबाबा आम्हांला आमच्या आजीवर सोडून कामावर जात असत. आणि आजी म्हातारी होती. तिला तसं काही कळायचं नाही. म्हणजे आम्हीं कुठे आहोत आणि काय करतोय वगैरे. कधीतरी कोणीतरी आमची तक्रार घेऊन यायचा तेव्हा मात्र ती आम्हांला ओरडायची. पण तसं तिच्याकडे आम्हीं लक्ष द्यायचो नाही. म्हणजे ती दुपारी मला बाजूला घेऊन झोपत असे. आणि तिच्या पाठीवर एक ही मोठ्ठी चामखीळ होती. मग ती खेचायला मला फारच मजा येत असे. आमच्या गल्लीच्या त्या तोंडाशी एक मोकळं मैदान होतं. आणि तिथे सहासहा दिवस एक सायकलवाला माणूस गोलगोल सायकल फिरवत असे. दुपारच्या उन्हांत सुद्धा. आणि त्याने ती न थांबता फिरवली की त्याला मोठ्ठं बक्षीस मिळत असे. मोठ्याने तिथे लाऊडस्पिकर लावलेला असे आणि त्यावर दिवसभर मस्तमस्त गाणी लावली जात. ती अगदी पार आमच्या घरी पण ऐकू येत. कितीतरी वेळ आम्हीं सगळी भावंडं गळ्यातगळे घालून ते बघत असू. "अगं, पण मग त्याला शू आली की तो काय करतो ?" असं मी एकदा बहिणीला विचारलं तर ती एकदम ओरडलीच माझ्या अंगावर. "मला नाही माहित !" ती माझ्यापेक्षा खरं तर इतकुशीच मोठी होती पण तरी तिला असंच वाटत असे की माझी सगळी जबाबदारी तिच्यावरच आहे. मला वैताग येत असे मग ती अशी मला ओरडली की ! "मग सांग ना ? कशावरून आपली नवी मामी प्रेमळ आहे ?" मी पुन्हां तिला विचारलं. "मी आज बघितलं...तिने ना एकदम चार पाच मांजरं गोळा केली होती. आणि ती ना त्या सर्वांचे लाड करत होती !"
"म्हणजे ती प्रेमळ आहे ?"
"अगं ! अशी काय ? तिला प्राण्यांबद्दल प्रेम आहे...म्हणजे ती प्रेमळच असणार ना ?" असं तेव्हां माझ्या ह्या मावस बहिणीला मनापासून वाटत होतं.
पण मामीने तिला खोटंच पाडलं. ती अजिबात प्रेमळ वगैरे नव्हती. म्हणजे तिच्या मनात जर काही प्रेमाची भावना असेल ती सगळी त्या मांजरांसाठी होती. भारी लाड करे ती त्यांचे. मग ह्या माझ्या आजोळी चारचार मांजरं एकाच वेळी घरभर फिरत रहायची. इथेतिथे. अगदी स्वयंपाकघरात सुद्धा. मामी आमचे लाड करत नाही आणि त्यांचे मात्र लाड करते हे मला कळलं. मांजरांना दूध मिळे. त्यांना मासे मिळत. पण कधी तिच्या हाताचे मासे खाण्याचा आमच्या नशिबी काही योग आला नाही !
मला मांजरं अजिबात आवडत नाहीत !

पण ही पिल्लं ?! आता काय करू मी ह्यांचं ? मी तिथे कितीवेळ उभी होते कोण जाणे. मनाला काही घड्याळ नसतं. म्हणजे त्याच्याशी कोणी शर्यत लावली तर कोणीच जिंकू शकत नाही. असं आहे माझं मन. कुठून कुठे ! दोन्ही पिल्लांनी पाय खेचत मार्केटच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूपर्यन्तचा प्रवास पार पाडला होता. आणि मी भूतकाळात फेरफटका मारला होता. जमीन ओली होती. माश्यांचे पाणी सर्वत्र सांडलेले होते. त्याच पाण्याने पिल्लं भिजली होती. भिजके केस ताठरलेले होते. हातपाय थरथरत होते. हो..हात आणि पाय. पुढचे दोन हात. आणि पाठचे दोन पाय. चला. झाला त्यांचा रस्ता ओलांडून. आता निदान गाडी खाली तरी नाही यायची ! मांजरं आवडत नाहीत म्हणून काय झालं ? त्यांनी अगदी जाऊन मरू नये असं मात्र मला नक्कीच वाटतं.
मी पुढे सरकले. एव्हढा मी जगभर प्रवास केला पण माश्यांच्या भरल्या भरल्या टोपल्यांसारखे सुंदर जगात काहीही दिसत नाही. अमेरिकेत किंवा दुबईत काचेआड ठेवलेल्या माश्यांत मात्र ही गंमत नाही. त्यापेक्षा समुद्राजवळच मांडलेला शारजातील मासळी बाजार किती देखणा दिसतो. टोपल्या टोपल्या येऊन उतरत असतात. गुलाबी कोलंबी अगदी हलती असते. स्वत:वरच खुष जशी. नजर जरा दूर नेली तर निळाशार समुद्र. पापलेट, सुरमई, बांगडे....कोलंबी...वा वा...किती घेऊ आणि काय घेऊ...
आणि विचार करा...एखादे चकचकीत पापलेट आहे...आणि समुद्रात ते बिचारे म्हातारे होऊन मरून गेले तर ते त्याच्यासाठी किती बरे दुर्दैवी असेल...त्याच्या आत्म्याला काय शांती मिळेल ? बिचारा कुठेतरी अश्रू ढाळत बसेल...आपण आयुष्यभर इथेतिथे नुसते फिरत राहिलो...शेपटी हलवत...आपला काडीचाही कोणाला उपयोग झाला नाही वगैरे...हे असे वाटणे फारच दु:खकारक असते. कोणालाही. आपल्या आयुष्याचा काही उपयोग नाही झाला वगैरे ! प्रत्येकाच्या आत्म्याला शांती मिळावयास हवी...काय वाटतं तुम्हांला ?

म्हणून म्हणते मी...अगदी छोट्यात छोट्या जीवाविषयी देखील अशी आत्मीयता वाटायला हवी...
:)

30 comments:

Raindrop said...

fish should never die of old age....that's what partha says too. Everytime I see a lamb and go 'aahh'...he says 'would have looked better on a plate'. Now I know what both of you mean :)

neela said...

>> म्हणून म्हणते मी...अगदी छोट्यात छोट्या जीवाविषयी देखील अशी आत्मीयता वाटायला हवी...

I love animals... and fish too.. they r so tasty... :-)

neeta said...

khop chaan!!!...

हेरंब said...

FWDed To : maneka.gandhi@I-Love-Animals-More-Than-Humans.com

रोहन... said...

कळले हो... :P आम्हाला काही कळत नाही समजू नका.. :D
येतोय १६ दिवसात मग बघू काय काय करून घालतेस ते... ;) बरी हो तो पर्यंत ठणठणीत... :)
म्याव.. म्याव..म्याव..म्याव..म्याव.. :D

Anagha said...

:D वंदू, आता पुन्हा आलीस ना की मस्त तिसऱ्या घेऊन जा त्याच्यासाठी. :)

Anagha said...

नीला !!! :D :D

Anagha said...

नीता, आभार. :)

Anagha said...

तिला मराठीचा एक शब्दकोश, मराठी व्याकरणाची भरपूर पुस्तकं पण पाठव रे हेरंबा ! :D :D

Anagha said...

येच तू रोहणा ! तुला ना मी बटाट्याची भाजी खायला घालणार आहे ! :D :D

Shriraj said...

गोष्ट वाचून झाल्यावर अगोदर हसायला आलं; पण नंतर तुझ्या मामीच्या विचाराने मी गंभीर झालो. कारण तशाच स्वभावाच्या एका व्यक्तीला मी भेटलोय. तिला माणसांपेक्षा मांजरच जास्त प्रिय आहेत. तिच्या घरीतर मांजरं आहेतच पण कामाच्या ठिकाणीसुद्धा ती एकसारखी पी.सी.वर मांजरांचे फोटोज बघत असते. (हो, माझ्याच ऑफिसात आहे ती:)

रोहन... said...

अनिथिंग व्हेजिटेरियन?

...करू करू.. तुमच्यासाठी काहीतरी करू.. बटाट्याची भाजी... :D

तू मला बचीभा खायला घालणार आहेस? तेरेको मेरा टीम नाही चेंज करनेका वापीस? ;)
इलेक्शन है.. मै जादा टाईम एक टीम मे नही रहेंगा.. ;)

Deepak Parulekar said...

छ्य्य! किते गो अशे करता तू ? ;प

मला फक्त जंगली मांजरी आवडतात.. :डःडःडःड

आणि हे काय सेनापती दल बदलायच्या भाषा करत आहेत. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रेरणा घेउन बटाट्याची भाजी खायला सुरुवात केलीय कि हो...

Anagha said...

जंगली मांजरी ?! 'राखी' नावाच्या का रे ? ;) :)
दीपक, सेनापती फितूर झालेले आहेत !!! :D :D :D

Anagha said...

हीहीही ! अरे श्रीराज, माझ्या दोन जिवलग मैत्रिणींचं मांजरींवर भारी प्रेम आहे ! त्यामुळे मी काही बोलू पण शकत नाहीये ! (म्हणजे हे इतकं सगळं बोलल्यावर ! :p) :D :D

Anagha said...

बरं बरं सेनापती, चिंबोऱ्या घालीन हा खायला तुला ! टीम बदलणारेस ना....मग काय म्हणशील ते घालीन खायला ! :D

Pankaj - भटकंती Unlimited said...

मला तर समुद्रातल्या हलणार्‍या जीवांविषयी फार आत्मीयता वाटते.म्हणून तर मुंबईला आपण मालवणी कट्ट्याला गेलो होतो ना !

Deepak Parulekar said...

eeeeeeeeeeeeeeeee ती कसली जंगली मांजर ! व्याक !
जंगली मांजर म्हणजे, तू डॉन नाही बघितला का???
ती प्रियांका... म्यॅव म्यॅव...

Anagha said...

अगदी बरोब्बर ! पंकज, आता दीपक एक नवीन हॉटेल म्हणतोय ना...तिथे जाऊया ! 'चैतन्य ! :) कधी जायचं बोल !

Pankaj - भटकंती Unlimited said...

जरा मधली जागा शोधा ना... म्हणजे लोणावळा, खंडाळा, खोपोली वगैरे. म्हणजे कसं पुण्यातही आत्मीयता वाटणारे बरेच लोक आहेत म्हणून म्हटलं.

Anagha said...

मग ती तूच शोध हा ! मला नाही माहित ! तू शोध आणि सांग आम्हांला ! आत्मीयता महत्त्वाची ! :D

रोहन... said...

लोणावळा - खंडाला मध्ये कुठे चांगले मासे मिळायचे :( एकतर चिकन खा नाहीतर तिथे जाऊन मासे बनवा. :) घर आहे का कोणाचे?

दिपक... तुला भेटीन तेंव्हा तुझ्याबरोबर व्हेज रे... ;)

Raindrop said...

for every sentence you say against 'manzars' u will have to give me n iru masssst panipuri treat....now go ahead n vent it out ;)

Anagha said...

:D :D वंदू ! नक्की नक्की ! :D :D

aativas said...

तुमच्या लहानपणीच्या आठवणी भारी आहेत एकदम :-)

सौरभ said...

ह्या माश्यांवर.. चिकन मटणावर शतदा प्रेम करावे... (सुरातालात हे गाणं रोज रेडिओ/टिव्हीवर वाजवलं पाहिजे)

Anagha said...

सविता, लिहायला एकदा सुरु केलं ना की मग मला पण कळतं की अरे किती कायकाय आहे अजून ! :) :)

Anagha said...

हेहे! सौरभा ! अगदी अगदी ! :D

भानस said...

तात्पर्य कळले हो! आम्हांला कळतात बरं ही सारी शब्दाणी! मला पण मासे आवडतात... फिशटॅंक मधले... :D:D

सेनापती दल बदलणार... हे काय भलतच ऐकतेय मी...:O:O

Anagha said...

श्री, बघच तू ! आता सेनापती आलेच म्हणून समज आमच्या दलात ! :D :D