नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday 4 December 2010

सिंधुताई सपकाळ

आज चित्रपट 'मी सिंधुताई सपकाळ' पाहिला.

आयुष्यातील दु:खाचे महत्व पुन्हा एकदा पटले.
एक दगड मार्गात आला. आणि तो मार्गच बंद झाला. आयुष्य नकोसे झाले. मग मानसशास्त्राच्या व्याख्येतील Survival Instinct, तीव्र जीवनेच्छा, प्रबळ झाली. फिनिक्स, आगीतून पुन्हा आकाशात झेपावला. त्याने पंख देखील असे पसरले की शेकडो स्त्रियांना साऊली मिळाली. माऊली मिळाली. अचंबित करणारे व स्त्रीत्वाचा अभिमान देणारे व्यक्तिमत्व तेजाळले.

त्यांची संपदा जोगळेकरने घेतलेली मुलाखत यूट्यूब वर ६/७ भागात उपलब्ध आहे त्यातील दोन भाग इथे टाकले आहेत. आवडले तर अर्थातच तिथे पुढील भाग पाहू शकाल.





10 comments:

सौरभ said...

माई एक वादळी व्यक्तिमत्व आहेत. पण शेतऱ्यांच्या विषयीचं मत पटलं नाही. असो... काय सुरेख वक्तृत्व करतात. मुद्देसुद आणि समोरच्याला भारावून/हेलावून/चेतवून टाकणारं. ह्यांच्या सोबत/साठी/सारखं काही करण्याची संधी मिळावी. महाराष्ट्राचे खरंच दुर्दैव कि असे आंधळे नेते लाभले ज्यांनी अश्या थोर व्यक्तींची दखल घेतली नाही.

Anagha said...

सौरभ, त्या चित्रपटातील प्रत्येक घटना ही खरी आहे...आणि हादरवून टाकणारी आहे. आणि अजिबात खूप खूप वर्षांपूर्वींची नाही. अगदी १९७५, २००० आणि २००९ अशीच वर्ष आहेत! हे आणि धक्कादायक! आपण रहातो शहरात, आणि अशीच कुठे एका गावात एक छोटीशी चिमुरडी रहाते भुकेली...अन्नपाणी आणि शिक्षणावाचून!! तीच वर्षं इथे मोठ्या थाटात आपण काढलेली असतात...!

Raindrop said...

All I can say is I am indebted to you for sharing this.

सौरभ said...

आपल्या पिढीतलं एक प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणजे माई आहेत. नं जाणो असे कित्येकजण प्रसिद्धी पराङमुख आपल्या सभोवताली आपल्या नकळत वावरत असतिल...

THEPROPHET said...

बरंच ऐकून होतो...पण जास्त माहित नव्हतं..
शेअर केल्याबद्दल धन्यवाद! :)

Anagha said...

विद्याधर, ते व्हिडिओस नक्की बघ. :)

हेरंब said...

सिंधुताईंबद्दल एक मोठा लेख वाचला होता काही वर्षांपूर्वी. तेव्हाच भारावून गेलो होतो.. !!

आता इथे राहून हा चित्रपट कधी बघायला मिळणार काय माहित :(

Anagha said...

DVD येईलच नाही का...मग ती तरी बघू शकशीलच तू हेरंब. ही मुलाखत मात्र वेळ मिळेल तेव्हा बघून घे.

रोहन... said...

पहिल्या दिवशी जाऊन चित्रपट पाहिला.. संपूर्ण भावला.. फक्त २ ठिकाणी त्यांची वाक्य आवडली नाहीत / पटली नाहीत. अर्थात ती त्यांची वैयक्तिक मते ती सुद्धा आधीच्या आयुष्यातील..

Anagha said...

बरोबर रोहन.