नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday 16 September 2010

चिऊताई...

पंजाबात एक माणूस चिमण्यांसाठी घरटी बनवतो.
अवकाशातील मोबाईलच्या अति वावराने चिमणे जीव जातायत त्यांना वाचवण्यासाठी.
रोज कामावरून घरी आले की कार्डबोर्डची घरे तयार करतात. आणि विकतात.

जंगलांवर अतिक्रमण.
अवकाशात घुसखोरी.
सगळ्यावर आपले मालकी हक्क.

लहानपणी शिकतो एक साखरेचा दाणा देखील वाटून घ्यावा.
आम्ही पृथ्वी वाटून खातो.

पूर्वी खिडकीच्या गजागजांवर नाचणाऱ्या चिमण्या, गेल्या महिन्यात हाँगकाँगमध्ये डिझ्नी लँडच्या जमिनीवर उड्या मारताना दिसल्या.
वेगळ्या नव्हत्या. आपल्याच वाटल्या.
एक घास चिऊचा. एक घास काऊचा.
गोबऱ्या गुबऱ्या चिमण्या डोळ्यांच्या मुलांबरोबर चाललेला चिमणा नाच.
स्वप्नवत परीकथेतील दुनियेत चिऊताई नाचत होती.
जलपरीबरोबर. जीनीबरोबर.

एक घरटं माझ्या दारी...
येशील का ग तू परतुनी?





8 comments:

Shriraj said...

कविता आणि छायाचित्र दोन्हीही रम्य :)

rajiv said...

देश व वेष बदलले तरी चिमणे डोळे व चिमण्या यातील निरागसता बदलत नाही ..
बदलते फक्त थोरांची मानसिकता ...:(

`संचारशील तो सर्व प्रदेश तुझा' देवाने मानवाला वर दिला ...
हव्यासापोटी इतका आडवा उभा धावणार..... दमणार ....
गलितगात्र होऊन कोसळल्यावर समजणार ....
अखेर माती होणार ....

Anagha said...

धन्यवाद श्रीराज. :)

Anagha said...

राजीव, चिमण्यांसारख्या इतक्या चिमुकल्या जीवाला पण आपल्या ह्या कृत्रिम जगात जागा नाही! :(

सौरभ said...

ह्या दुर्मिळ पक्ष्यांचा थवा मीपण दोन दिवसांपुर्वी पहिलेला. असो... बाकी सगळं जाऊद्या... जलपरीला वाचवा... ती एक(टी)च आहे...

शेवटची दोन वाक्य मी बदलतोय... जलपरीसाठी...

एक डबकं माझ्या दारी...
येशील का ग तू पोहुनी? :D (^.^)
(डुंबा डुंबा डुंब डुंब डुबुक डुबुक)

Anagha said...

सौरभ, ह्या फोटोत दिसतेय खरी तुला ती एकटी...पण ती जी काही शेपटी इथेतिथे उडवून अदा दाखवत होती, त्यामुळे तिच्याभोवती चांगलीच गर्दी होती! आणि तुझं हे डबकं नेमकं कुठे आहे....भारतात की परदेशात? तसं पाठवायला त्या गोऱ्या जलपरीला! :D

सौरभ said...

:D सध्यातरी परदेशात आहे... पाऊस पडला की अंगणात साचतात. मग आम्ही त्यात डराव करतो.. I mean सराव करतो.. ;)

रोहन... said...

मध्यंतरी चिमण्या गायबच झाल्या होत्या. आता मात्र किमान माझ्या घरच्या टेरेसवर तरी नक्की नाचतात. २-३ बर्ड हाउस सुद्धा बनवली आहेत आम्ही. बघुया कधी घर करतात त्यात.